Ad will apear here
Next
राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादची ऋतुजा बक्षी विजेती
राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड झालेल्या चार विजेत्यांसह संयोजक

पुणे : अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेच्या वतीने, पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय मानांकन खुला गट राज्य निवड चाचणी फिडे रेटिंग स्पर्धा नुकतीच पुण्यात पार पडली. या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून २३३ खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत औरंगाबादची ऋतुजा बक्षी प्रथम क्रमांकाची विजेती ठरली. अन्य विजेत्यांमध्ये ऋषी कदम, वेदांत पिंपळखरे, सिद्धांत ताम्हणकर, केवल निर्गुण, आविष्कार वानखेडे, संजीव मिश्रा, सौरभ म्हमाणे, अभिजित बिलपे, सोहम पवार यांचा समावेश आहे. 

ऋतुजा बक्षी
स्पर्धेतील विजेत्यांना जागतिक दिव्यांग बुद्धिबळ स्पर्धा विजेते व शिवछत्रपती पुरस्कार विजेते शशिकांत कुतवळ यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. या वेळी  शिवभूमी शिक्षण मंडळाचे सहसचिव संग्राम कोंडे, शिवछत्रपती राज्य पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक जोसेफ डिसुझा, राज्य बुद्धिबळ संघटनेचे कोषाध्यक्ष व पुणे जिल्हा संघटनेचे सचिव राजेंद्र कोंडे, पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सदस्य अभिजित जोशी उपस्थित होते. 

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जितेंद्र वाळिंबे, वैष्णवी बापट, सुरेश देशपांडे आदींनी मेहनत घेतली. स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून राजेंद्र शिदोरे यांनी काम पाहिले, तर सह पंच म्हणून पवन राठी, दीप्ती शिदोरे, शार्दूल तपासे, वैभव देशमुख, श्रद्धा विंचवेकर यांनी काम पाहिले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZWKCG
Similar Posts
पुण्याची स्वराली देव आणि ओम मुरकुटे यांचे युरोपातील आइस स्केटिंग स्पर्धेत यश पुणे : इंटरनॅशनल स्केटिंग युनियनतर्फे युरोपातील बेलारूस येथे घेण्यात आलेल्या आइस स्केटिंग स्पर्धेत पुण्याची स्वराली देव आणि ओम मुरकुटे या दोघांनी यशस्वी कामगिरी केली. पंधरा वर्षांखालील मुलांच्या गटात पाचशे, हजार आणि पंधराशे मीटर स्केटिंगचे टप्पे यशस्वीपणे पार करत ओमने बेलारूस करंडक पटकावला. १९ वर्षांखालील गटात स्वराली देवने करंडक जिंकला
‘इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट हंट’मध्ये पुण्यातील दोन मुलींची निवड पुणे : रेसिंगमधील नव्या पिढीतील गुणवत्ता शोधण्यासाठी इदेमित्सु आणि होंडा इंडिया यांच्या वतीने आयोजित ‘इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट हंट’मध्ये पुण्यातील दोन मुलींची निवड करण्यात आली आहे. दहा ते १८ वर्षे वयोगटातील २२ जणांचा यात समावेश आहे.
सिंधी प्रीमियर लीग क्रिकेट रंगणार दोन डिसेंबरपासून पिंपरी : ‘देशभरात विखुरलेला सिंधी समाज एकत्रित यावा, तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून द्यावे, तसेच मोबाइल-इंटरनेटच्या जाळ्यात न अडकता मैदानावरील खेळण्याला प्राधान्य द्यावे यासाठी आयोजित केली जाणारी सिंधी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा यंदा दोन डिसेंबर ते १८ डिसेंबर २०१९ या कालावधीत पिंपरी येथे रंगणार आहे. पिंपरी
‘पीआयसी’च्या वतीने नावीन्यपूर्ण संशोधनांचा सन्मान; गटार स्वच्छ करणाऱ्या रोबोला पुरस्कार पुणे : गटारे स्वच्छ करताना विषारी वायूंमुळे अनेक कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी केरळमधील काही तरुण अभियंते पुढे सरसावले आहेत. या तरुणांनी स्थापन केलेल्या ‘जेनरोबॉटिक्स’ या कंपनीने ‘बँडीकूट’ नावाचा गटार स्वच्छ करणारा रोबो बनवला असून, त्यांच्या या संशोधनाचा नवव्या ‘अंजनी माशेलकर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language